आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याजवळ एसटी बस -ट्रकच्या अपघातात चार ठार, ३३ जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणे जिल्ह्यातील चाकण- तळेगाव दाभाडे महामार्गावर माळवाडी येथे मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एसटी महामंडळाची बस व ट्रक यांची समाेरासमाेर धडक हाेऊन बसमधील चाैघांचा मृत्यू झाला, तर ३३ प्रवासी जखमी झाले. या भीषण अपघातात एसटी बस अाणि ट्रक या दाेन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे.

भिकू गुलाबराव जाधव (वय-६५, रा. पाबळ, ता. शिरूर, पुणे), शैला विलास भागीत (२८, रा. खेड, पुणे), मुश्रफ जमादर (५५) अशी मृतांची नावे अाहेत. अन्य एका ६५ वर्षीय मृताची अाेळख पटू शकली नाही. जखमींमध्ये १८ पुरुष व १५ महिलांचा समावेश असून त्यांच्यावर माळवाडी परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. याप्रकरणी तळेगाव एमअायडीसी पाेलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

शिरूर-कुर्ला नेहरूनगर ही एसटी बस (एमएच १४/ बीटी ३४९२) चाकणकडून तळेगावमार्गे कुर्ला येथे जात हाेती. विरुद्ध दिशेने चाकणकडे येणारा ट्रक व या बसची समाेरासमाेर जाेराची धडक झाली. या भीषण अपघातात बस चालकाच्या बाजूने ट्रक घुसल्याने एसटीचा एका बाजूचा पत्रा कापला गेला. यात बसमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव, देहू राेड, वडगाव येथील पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकांना घटनास्थळी बाेलवून जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात हलविले. पाेलिसांनी मृत प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तळेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

वाहतुकीची काेंडी
सदर अपघातामुळे तळेगाव-चाकण रस्त्यावरील वाहतुकीची काही वेळ काेंडी झाली, त्यामुळे रस्त्याच्या दाेन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या. नंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पाेलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. काही वेळाने दाेन्हीकडील वाहतूक खुली झाली.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...