आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे : सहा वर्षांच्या चिमुरडीवर चार अल्पवयीनांचा बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सहा वर्षांच्या चिमुरडीवर चार अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना पिंपरी परिसरात घडली. या चाैघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित चिमुरडीवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अाराेपी मुलांची वय अनुक्रम ८, ९, १० आणि १५ वर्षे आहे.

पिंपरी येथील अण्णासाहेब मगर झोपडपट्टीत शनिवारी रात्री ही घटना घडली. पीडित मुलगी घराजवळ खेळत असताना अल्पवयीन मुलांनी तिला निर्जनस्थळी नेत अत्याचार केले. घटनेनंतर मुलगी रडत घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, गुन्हा केलेली मुले अल्पवयीन असली तरी त्यांना जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करु, प्रतिक्रिया शिवसेनेच्या उपनेत्या अामदार नीलम गोऱ्हे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...