आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कामात मोठ-मोठ्यांना वरचढ ठरतो हा 4 वर्षीय चिमुरडा, लोक संबोधतात \'लिटिल शेफ\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील एका 4 वर्षीय चिमुरड्याची सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे. चपात्या (पोळ्या) बनवण्यात त्याचा हात कोणीही धरू शकत नाही. स्थानिक लोक तर त्याला 'लिटिल शेफ' असे संबोधतात. छोट्या छोट्या हातांनी तोौ शानदार गोलाकार चपत्या बनवतो. त्याचा कारनामा पाहून सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

एखाद्या शेफप्रमाणेच बनवतो चपात्या...
- अंकित असे या चिमुरड्याचे नाव आहे. तो म्हात्रे पुल भागात राहातो. लोक त्याला 'लिटिल शेफ अंकित' असे संबोधतात.
- चार वर्षीय अंकित ज्यूनिअर केजीमध्ये ‍शिकतो. अभ्यासात हुशार असलेला अंकित घरातील कामातही एक्सपर्ट आहे.
- तो एका शेफप्रमाणे प्रोफेशनल पद्धतीने चपात्या बनवतो. इतकेच नाही तर तो चपात्या व्यवस्थित शेकतोही.
- चपात्याप्रमाणे तो ऑमलेट आणि इतर भाज्या सहज बनवून घेतो.

टीव्हीवरील कुकिंग शो पाहून शिकला अंकित
 - अंकित मागील तीन वर्षांपासून स्वादिेष्ट मिठाई, फ्राइड फिश आणि इतर पकवान्न बनवतो आहे.
 - तो टीव्हीवरील कुकरी शो जास्त पाहातो.
- यूट्यूबवरील संजीव कपूरचे चॅनल पाहाणे त्याला आवडते.
 
एक वर्षापासून कणिक आणि लाटण्याशी खेळतोय अंकित...
-
अंकितच्या आईने सांगितले की, तो एक वर्षाचा असताना कणिक आणि लाटण्यासोबत खेळत आहे.
- पाहाता पाहाता काही महिन्यांत अंकित याने गोलाकार चपात्या लाटणे शिकला.
- अंकितचे वडील सॉफ्टवेयर इंजिनिअर आहे. त्याला चपात्या बनवता येत नाहीत. अंकित भविष्यात मोठा शेफ बनले, असा विश्वास आई-वडिलांनी व्यक्त केला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अंकितचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...