आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 तासांची शर्थ अखेर व्यर्थ गेली, बोअरवेलमध्ये पडला होता सोन्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सुमारे 31 तासांपासून बोअरवेलमध्ये अडकलेल्या वर्षीय सुनील उर्फ सोन्या हरिदास मोरे या चिमुरड्याला बाहेर काढण्याची मोहीम यशस्वी झाली मात्र उपचारासाठी रूग्णालयात नेत असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला.

शितोळे वस्तीवरील अरुण शितोळे यांच्या शेतात काल रात्रीच बोअरवेल घेण्यात आला; 25 फूट खोदूनही पाणी लागल्याने तो तसाच सोडून देण्यात आला. त्या वेळी वापरलेले पाइप बाहेर काढल्याने खड्डा मोठा झाला. शनिवारी सकाळी सुनील हा आजी तुळसाबाई यांच्यासोबत शेतात गेला. तेथे खेळत खेळत बोअरवेलजवळ आला पाय घसरून बोअरवेलमध्ये पडला.
हा प्रकार लक्षात येताच आजीने आरडाओरडा केली. आजूबाजूचे लोक जमा झाले, तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षकांना कळवण्यात आले. जेसीबी आणि बचावाच्या साहित्यातून बचाव मोहिमेत शेजारी खड्डा खणण्यात आला. आणि 31 तासांनंतर सुनीलला बाहेर काढण्यात यश आले. मात्र त्यास रूग्णालयात नेत असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला.
पुढे पाहा, या घटनेतील छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...