आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 40 Thousand Vacancy In Engineering, Admission Capacity Big Compare The Students

इंजिनिअरिंगच्या 40 हजार जागा रिक्त; विद्यार्थी संख्येपेक्षा प्रवेश क्षमता अधिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) अभ्यासक्रमाच्या विविध शाखांमधील सुमारे 40 हजार जागा यंदादेखील राज्यात रिक्त राहण्याची चिन्हे आहेत. विद्यार्थी संख्येपेक्षा अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता अधिक असल्याने रिक्त जागांचे प्रमाण वाढत आहे. गतवर्षीही 30 हजारांपेक्षा अधिक जागा रिकाम्या राहिल्या होत्या.


राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशाची दुसरी फेरी गुरुवारी संपली. त्यानंतर रिकाम्या राहणा-या जागांचे चित्र स्पष्ट झाले. राज्यात एकूण 1 लाख 33 हजार 432 जागांपैकी फक्त 60 हजार 544 जागांचे प्रवेश विद्यार्थ्यांनी निश्चित केले आहेत. गुरुवारी संपलेल्या फेरीत आणखी 30 हजार जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिमत: सुमारे 40 हजार जागा ओस पडतील, असे सूत्रांनी सांगितले. येत्या ८ जुलै रोजी अभियांत्रिकी कॉलेजातील प्रवेशाची तिसरी फेरी होत आहे.


सीईटीत 2.5 लाख विद्यार्थी पात्र
यंदा झालेल्या अभियांत्रिकी सीईटीला 2 लाख 85 हजार 112 विद्यार्थी बसले होते. यापैकी पात्र विद्यार्थ्यांची संख्या अडीच लाखांच्या घरात आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येतील निम्मे विद्यार्थीसुद्धा अभियांत्रिकी शाखांकडे वळण्याची चिन्हे नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.


वाढीव जागांना वारेमाप अनुमती
जागा रिकाम्या राहत असताना ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) यंदा 18 हजार वाढीव जागा दिल्या आहेत. यात 10 हजार डिग्री, तर ८ हजार जागा डिप्लोमाच्या आहेत. शिवाय 11 नवी कॉलेजेस उघडण्यास परवानगी दिली आहे. कॉलेजांची संख्या 366 झाली आहे.

या शाखांना ‘डिमांड’ नाही
इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाइल, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बायो-मेडिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, प्रॉडक्शन या शाखांकडे ओढा नाही.
या शाखांना ‘डिमांड’ कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल या शाखांकडे विद्यार्थ्यांचा ओढा असल्याचे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले.

बोलके आकडे
1,33,432 एकूण जागा राज्यात
60,544 जागांवरील प्रवेश निश्चित
30,000 जागा दुस-या फेरीत भरतील
366 इंजिनिअरिंग कॉलेज राज्यात