आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगाेलीचे ४० वारकरी ट्रक उलटून जखमी, अाळंदीकडे जाताना भीमाशंकरजवळ अपघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील वारक-यांचा ट्रक उलटून ४० जण जखमी झाल्याची घटना भीमाशंकरच्या पोखरी घाटात सोमवारी सकाळी घडली. - Divya Marathi
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील वारक-यांचा ट्रक उलटून ४० जण जखमी झाल्याची घटना भीमाशंकरच्या पोखरी घाटात सोमवारी सकाळी घडली.
पुणे - हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील वारक-यांचा ट्रक उलटून ४० जण जखमी झाल्याची घटना भीमाशंकरच्या पोखरी घाटात सोमवारी सकाळी घडली. ट्रकचालक हरिभाऊ पुराबजी सुपेकर (रा. खांडगाव, ता. वसमत) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

वसमत तालुक्यातील ६१ वारकरी एका ट्रकने भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी निघाले हाेते. भीमाशंकर येथे देवदर्शन आटोपल्यानंतर ते अाळंदीच्या दिशेने निघाले हाेते. भीमाशंकर-मंचर मार्गावरील पाेखरी घाटात अाला असताना सकाळी नऊच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. यात ४० वारकरी जखमी झाले. घटनेनंतर २८ जणांना घाेडेगाव रुग्णालयात तर १० जणांना मंचर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात अाले आहे. यापैकी दाेन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात अाले अाहे.