आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारा पुन्हा चढला; विदर्भात 46 तापमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/नागपूर- राज्यात उष्णतेची लाट पुन्हा आली असून तापमानात सरासरी 2 ते 3 अंशांची वाढ झाली आहे. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, वर्धा येथे गुरुवारी राज्यातील सर्वाधिक 46 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल परभणी-अकोल्यात 45 अंशांपर्यंत पारा चढला होता. पुढील 24 तासात कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असून हवा कोरडी असेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. गेल्या 24 तासातील प्रमुख शहरांमधील तापमान अंश सेल्सियसमध्ये असे : मुंबई- 34, पुणे - 41, नगर- 43, जळगाव -44, मालेगाव - 44, नाशिक - 38, सोलापूर - 44, औरंगाबाद - 42, उस्मानाबाद- 44, अकोला -45.