आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात लागलेल्या इमारतीच्या आगीत 46 वाहनांची होळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कोथरूड भागातील त्रिमूर्ती हाइट्स या सहामजली इमारतीच्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत पार्किंगमधील 46 वाहने जळून खाक झाली. सुदैवाने इमारतीत अडकलेल्या सुमारे 50 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे.

सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास त्रिमूर्ती हाइट्स या इमारतीच्या गोडाऊनमध्ये आग लागली. ती झपाट्याने पसरल्याने पार्किंगमधील सर्व वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. याच इमारतीत असलेल्या केयूर इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे हे गोडाऊन आहे. इमारत सहामजली असून त्यात 24 फ्लॅट्स व तळमजल्यावर काही दुकाने आहेत. अपरात्री लागलेल्या आगीमुळे परिसरात घबराट पसरली होती. मात्र अग्निशमन दलाच्या पथकाने सात गाड्या, टँकर, ब्रँटो (उंच शिडी) आणि रेस्क्यू व्हॅन यांच्या मदतीने दीड तासात परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. आग पसरत गेल्याने परिसर धुराने वेढला गेला होता. त्यामुळे इमारतीतील अनेक नागरिकांना धुराचा त्रास झाला. गच्चीवरील लोकांची ब्रँटोच्या साह्याने सुटका करण्यात आली. जवानांनी चार महिन्यांचे चिमुकलेही शिडीवरून सुरक्षित खाली आणले.