पुणे- भारतात लहान मुलांमध्ये स्थूलपणा माेठ्या प्रमाणात वाढत चालला असून हा स्थूलपणा सर्वच सामाजिक-अार्थिक स्तरांत अाढळून येत अाहे. या अनुषंगाने मुंबर्इ अाणि पुण्यातील विविध खासगी अाणि महानगरपालिका शाळांत नुकतेच सर्वेक्षण करण्यात अाले. या सर्वेक्षणात अाठवी ते दहावी इयत्तांमधील हजार विद्यार्थ्यांची पाहणी करण्यात अाली. या पाहणीत 50 टक्के मुले स्थूल आणि लठ्ठ गटात मोडत असल्याचे आढळून आले आहे. यापैकी 18 टक्के मुले स्थूल, 32 टक्के विद्यार्थ्यांचे वजन प्रमाणापेक्षा (लठ्ठपणा गटात) अधिक हाेते, तर 52 टक्के मुलांच्या कुटुंबांत मधुमेह असलेल्या व्यक्ती अाढळून अाल्याची माहिती महाराष्ट्र टास्क फाेर्सच्या अध्यक्षा जेटी फाउंडेशनच्या संचालिका डाॅ. जयश्री ताेडकर यांनी दिली अाहे.
डाॅ. ताेडकर म्हणाल्या, 2016 च्या जगभरातील अाकडेवारीनुसार 5 ते 19 वर्षे वयाेगटातील सुमारे 34 कोटी मुले प्रमाणापेक्षा जास्त वजनाची किंवा स्थूल अाहेत. जागतिक अाराेग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचअाे) पाच वर्षे वयाखालील 4. 1 कोटींपेक्षा मुले प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेली किंवा स्थूल अाहेत. ग्रामीण अाणि शहरी भागात राेटरी क्लबतर्फे आयोजित अाराेग्य शिबिरात तसेच सर्वेक्षणात अनेक स्थूल विद्यार्थी अाढळून अाले अाहेत.
आनुवंशिकता, खानपानाच्या सवयीतील बदल, टीव्ही- माेबाइलचा स्क्रीनटाइम यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढू लागली अाहे. लहानपणी हाेणाऱ्या स्थूलपणामुळे तरुण वयात मृत्यू येण्याची खूप शक्यता असते. त्याचप्रमाणे जीवनशैलीशी निगडित विकारांप्रमाणेच इतरही विकार जडू शकतात, असे त्यांनी या वेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे हस्ते लठ्ठपणाविषयी माहितीपटाचे गुरूवारी उद््घाटन-
बालदिनाचे अाैचित्य साधत लहान मुलांमधील वाढलेल्या लठ्ठपणास अाळा घालण्यासाठी 'लढा लहान मुलांमधील वाढत्या स्थूलपणाशी' माेहिमेची घाेषणा राेटरी क्लब अाॅफ काेरेगाव पार्क जेटी फांडेशनच्या वतीने करण्यात अाली अाहे. स्थूलपणासंदर्भात जनजागृतीविषयक माहितीपट तयार करण्यात अाला आहे. त्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 16 नाेव्हेंबर राेजी पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात हाेणार अाहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती....