आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजारपण ठरले आत्महत्येचे कारण... पुण्यात 55 वर्षीय महिलेने केली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आजारपणाला कंटाळून मोशी येथील 55 वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आज (बुधवार) सकाळी ही घटना घडली. प्रमिला प्रकाश हसे (रा.निसर्ग राघवेंद्र वसाहत, मोशी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशीमधील निसर्ग राघवेंद्र वसाहत येथे राहणाऱ्या प्रमिला हसे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रमिला हसे यांना 2 वर्षांपासून डोक्यात गाठ झाली होती. मागील काही महिन्यांनापासून या आजारामुळे प्रमिला यांना असह्य त्रास होत होता. या आजारपणाला कंटाळूनच प्रमिला यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्न झालेले मुलगा आणि सून राहत्या घरात दुसऱ्या खोलीत झोपले होते, त्यानंतर मुलगा हृषीकेश हसे याने बघितले असता घटना समोर आली. पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत महिला उपचारापूर्वी मृत्यू पडली होती.  पुढील तपास मोशी पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...