आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

67 वर्षीय लताबाईंची मॅरेथॉन विजयाची हॅट‌्ट्रिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- पतीच्या उपचारासाठी पैसे मिळावेत, या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी बारामतीतील शरद मॅरेथॉन स्पर्धेत ६७ वर्षीय लताबाई करे अनवाणी धावून पहिल्या आल्या होत्या. त्यांनी यंदाही सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेत यश मिळवले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील करे कुटुंब वर्षांपासून बारामती जवळच्या पिंपळी गावात राहते. २०१४ मध्ये पहिल्यांदा मॅरेथाॅनमध्ये यशस्वी झाल्यानंतर लताबाईच्या हलाखीच्या परिस्थितीचे वास्तव समाेर अाले हाेते. त्या वेळी एका एनजीओने त्यांच्या पतीवर उपचारांचा खर्च केला हाेता.

‘दिव्य मराठी’मुळे मिळाली होती मदत
‘दिव्य मराठी’त लताबाईंचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांना देशभरातून मदत मिळाली. यामुळे त्यांना त्यांच्या पतीवर उपचार करता आले.