आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे- मुंबई एक्सप्रेसवेवर विचित्र अपघात; 7 ते 8 वाहने एकमेकांवर आदळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्यामध्ये दहा गाड्यांचा विचित्र अपघात झाला. रस्त्यावर सांडलेले ऑइल आणि पडलेल्या पावसामुळे रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे हा अपघात झाला असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. हा अपघात सोमवारी (ता.4) रात्री साडे आठ ते नऊच्यादरम्यान झाला. या अपघातामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

या अपघातामध्ये मारुती इको (एमएच 48 एएल 3573), पिकअप (एमएच 14 जीडी 8511), टोयोटो (एमएच 12 केएन 3323), टेम्पो (जीजे 01 एफटी 0837), स्विफ्ट डिझायर (एमएच 04 जीई 6772) तसेच एक एसटी आणि एशियाड बस यांचा समावेश आहे.

 

मुंबई-पुणे लेनवर वाहनांमधून सांडेलेले ऑईल आणि ओखी वादळामुळे पडत असलेल्या पावसामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. काल रात्री या लेनवर एक गाडी घसल्याने मागील गाडीने ब्रेक मारला. अचानक ब्रेक मारल्याने या गाडीमागील इतर गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातामुळे काही वेळाकरीता वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र महामार्ग पोलिसांनी अपघात ग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.

 

या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही अपघातग्रस्त वाहन चालक घटनेनंतर निघून गेले आहेत तर काही जणांनी कामशेत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अचानक पडत असलेल्या पावसामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी आपली वाहने चालवताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... पुणे- मुंबई एक्सप्रेसवेवर विचित्र अपघाताचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...