आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात 7 वर्षीय मुलावर अनैसर्गिक शारीरिक अत्याचार, 5 जण अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील वारजे-माळवाडी परिसरात एका सात वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरूण व तीन अल्पवयीन मुलांना अशा 5 जणांना अटक केली आहे. दरम्यान, अत्याचार झालेला गंभीर जखमी असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या मुलाला छातीला ह्दयाला गंभीर मार लागला आहे. त्यामुळे ह्दय सरकल्याची माहिती मिळत आहे. मुलाची प्रकृती धोक्याबाहेर असून, तो सकाळपासून उपचारांना प्रतिसाद देऊ लागला आहे.
याप्रकरणी पिडीत मुलाच्या आईने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी नितीन वेंकटेश भंडारी (21) आणि रवी माणिक पवार (23, दोघेही रा. लक्ष्मीनगर, कोथरूड) या दोघांसह तीन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित 7 वर्षीय मुलगा इयत्ता दुसरीत शिकतो. तो घराजवळील एका मंदिरात आईसोबत दर्शनाला गेला होता. मात्र, आई कामानिमित्त लगेच घरी गेली व तो मंदिर परिसरात थांबला. त्यावेळी भंडारी व पवारसह आणखी तिघा अल्पवयीन मुलांनी त्याचे अपहरण केले. त्याला गाडीवर बसवून अज्ञातस्थळी एका खाणीजवळ शारीरिक अत्याचार केले. बराच वेळ झाला तरी मुलगा घरी न आल्याने आईने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र तो आढळला नाही. रात्री साडेनऊच्या सुमारास तो मंदिर परिसरात रडत असताना आढळला. त्यावेळी तेथील लोकांनी चौकशी केली असता त्याला मारहाण झाल्याचे लक्षात आले. काही वेळातच तो मुलगा बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. भांडणाच्या वादातू ठरवून हे कृत्य केल्याचे समोर येत आहे. वारजे पोलिस ठाण्याच्या गुन्हे विभागाचे निरीक्षक के एस पुजारी तपास करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...