आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7 Year Old Girl Dead Body Found In Lonavala Kumar Resort Hotel News In Marathi

लग्नात आलेल्या 7 वर्षीय चिमुरडीची बलात्कार करून निर्घृण हत्या, लोणावळ्यात राडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लोणावळ्यातील हॉटेल कुमार रिसॉर्टमध्ये एका लग्न समारंभात आलेल्या एका सात वर्षीय मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घडना उघडकीस आली आहे. हॉटेलच्या टेरेसवर मुलीचा मृतदेह आढळून आला होता. मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्‍यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेचे लोणावळ्यासह पिंपरीत तीव्र पडसाद उमटले आहेत. संतापलेला जमाव रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त केला आहे. लोणावळा शहरात कडकडीत बंद पाळला जात आहे. दुसरीकडे संतप्त जमावाने कुमार रिसॉर्टवर दगडफेक केली. काही गाड्यांची जाळपोळ केली. जुना पुणे-मुंबई महामार्गही रोखण्याचा प्रयत्न केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस अारोपीचा शोध घेत आहेत. राज्यगृहमंत्री राम शिंदे यांनी पीडितेच्या नातेवाईकांना शांतता राखण्‍याचे आवाहन केले आहे.

मिळालेली माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथील जैन कुटुंबीय आपल्या सात वर्षाच्या मुलीसह 16 फेब्रुवारीला लग्नसमारंभात सहभागी झाले होते. मात्र, त्याच दिवशी ही मुलगी बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. नंतर पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दुसर्‍या दिवशी अर्थात मंगळवारी (17 फेब्रुवारी) पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता रात्री चिमुरडीचा मृतदेह कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर आढळून आला. यामुळे संतप्त नागरिकांना कुमार रिसॉर्टमध्ये तोडफोड केली आहे. मुलीचा गळा चिरून हत्या करण्‍यात आली आहे. हत्या करण्‍यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे पोस्टमार्टमच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

कुमार रिसॉर्टमध्ये 30 ते 35 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र त्यापेक्षा फक्त‍ 10 कॅमेरे सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालकमंत्री गिरीष बापट यांनी मंगळवारी घटनास्थळाला भेट ‍दिली होती. गिरीष बापट यांनी मुलीच्या नातलगांशी संवाद साधला. त्यांचे सात्वंन केले.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, लोणावळ्यात संतप्त जमावाने केलेल्या तोडफोडीची फोटो....