आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 70 Thousand Crores Highways Contruct In State Nitin Gadkari

राज्यात ७० हजार कोटींचे महामार्ग बांधणार - नितीन गडकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - 'महामार्गांसाठी आवश्यक भूसंपादन वेळेत पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पावले उचलली आहेत. पर्यावरण खात्याचे आक्षेपही दूर केले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात ७० हजार कोटी रुपयांच्या महामार्ग बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे,’ अशी माहिती केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि गडकरी यांची शनिवारी पुण्यात एकत्रित बैठक झाली. या वेळी राज्यातील रखडलेल्या महामार्गांच्या कामांना गती देण्यासंदर्भात चर्चा झाली. याची माहिती गडकरी यांनी दिली. ‘मोदी सरकार देशात १० लाख कोटी रुपयांची कामे वाहतुक विकासावर खर्च करणार आहे. यातील १ लाख कोटी महाराष्ट्रात खर्च व्हावेत, असा माझा प्रयत्न आहे’, असे ते म्हणाले. गडकरी म्हणाले की, पर्यावरणाचे संतुलन राखून विकासकामे करण्यावर आमचा भर राहील. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात देशात दररोज २ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होत होते. हा वेग आम्ही येत्या दोन वर्षात ३० किलोमीटर रस्ते प्रतिदिवस इतका करणार आहोत.
पुढे वाचा, सव्वाशे टोलनाके लवकरच बंद करणार