आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुराच्या पाण्यात फसली वृध्द महिला, गावकरी वाचविण्यास पोहचल्यावर घडले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किनाऱ्यापासून 50 फूट अंतरावर पाण्यात अडकलेली वृध्द महिला. - Divya Marathi
किनाऱ्यापासून 50 फूट अंतरावर पाण्यात अडकलेली वृध्द महिला.
पुणे- वडगाव काशिंबे येथे एक 70 वर्षाची वृध्द महिला नदीच्या पुरात मधोमध अडकली होती. पोलिस आणि गावकऱ्यांनी 4 तास प्रयत्न करुन या महिलेला पाण्याच्या बाहेर काढले. या महिलेला त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
नागरिकांनी असा वाचविला वृध्देचा जीव
- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वडगाव काशिंबे हे गाव आहे. शशिकला डोके (वय 70) या कपडे धुण्यासाठी घोडनदीच्या काठावर गेल्या होत्या.
- त्यावेळी डिंभे धरणातून 12 धरणातून 500 क्यूसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीला पूर आला.
- त्यामुळे शशिकला नदीच्या मधोमध एका दगडावर अडकल्या. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले.
- पोलिसही त्वरित घटनास्थळी आले. पण पुराचे पाणी वाढत असल्याने तेही हतबल झाले होते.
- पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून एनडीआरएफला बोलवले.
- त्यानंतर प्रशासनाला सांगून धरणातून सोडण्यात येणारे पाणी कमी करण्यात आले. त्यानंतर मानवी साखळी करुन आजीला पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
- त्यानंतर या महिलेला मंचर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...