आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाठवीपर्यंतची मूल्यमापन चाचणी १९ अाॅक्टाेबरपासून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत घेण्यात येणारी संकलित मूल्यमापनाची पहिली चाचणी १९ अाणि २० अाॅक्टाेबरला हाेणार अाहे. राज्यातील इयत्ता पहिली ते अाठवीपर्यंतचे एक काेटी ६० लाख विद्यार्थी ही चाचणी देणार अाहेत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.

राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व बाेर्डांच्या पहिली ते अाठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या नैदानिक चाचण्या गेल्या वर्षीपासून घेतल्या जात अाहेेत. गेल्या वर्षी प्रथमच ही चाचणी घेताना विद्यार्थ्यांच्या प्रचंड संख्येमुळे विभागाची फरपट झाली. परिणामी चाचणी क्रमांक एक रद्द करावी लागली हाेती. यंदा मात्र गेल्या वर्षीच्या चुका टाळून शिक्षण विभागाने सुुरुवातीपासून नियाेजन केल्यामुळे पायाभूत चाचणीसह संकलित मूल्यमापन चाचणीही वेळेवर हाेण्याचे चित्र अाहे. एकूण दहा माध्यमांतून प्रथम भाषा अाणि गणित अशा दाेन विषयांची ही चाचणी घेण्यात येणार अाहे. शासन निर्णयानुसार पायाभूत चाचणीच्या गुणांचा विचार करून मूल्यमापन करण्यात येणार असले तरी अद्याप पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांपुरते मर्यादित अाहेत. सरल प्रणालीत हे गुण अद्ययावत झालेले नाहीत. त्यामुळे त्यांची माहिती अजून शासनापर्यंत पाेचलेली नाही. सर्व बाबी याही वेळी शिक्षकांच्या हाती असतील.

या चाचणीद्वारे विद्यार्थ्याने त्या त्या वर्गातील किती क्षमता प्राप्त केल्या हे तपासले जाणार अाहे. त्यामुळे विद्यार्थी काेणत्या गाेष्टीत मागे अाहे हे लक्षात येऊन त्यावर काम करणे शक्य हाेणार अाहे.

नववी- दहावीच्या वर्गालाही चाचणी?
- यंदा माध्यमिक लाही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम लागू हाेणार असल्याने नववी व दहावीसाठीही नैदानिक चाचण्या लागू हाेणार अाहेत. मात्र शिक्षण विभागाकडून पुष्टी मिळालेली नाही.
- विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्रयस्थ संस्थेकडून केले जाणार असे शासनाने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात तसे नाही. काही संस्थांची निवड करण्यात अाली असली तरी त्यांची नावे शासनाने जाहीर केलेली नाहीत. या त्रयस्थ संस्थांचे निकाल, निष्कर्ष काय अाहेत याची माहितीही दिलेली नाही.
बातम्या आणखी आहेत...