बारामती- पतीच्या हदयरोगावर उपचाराला लागणा-या खर्चासाठी कडाक्याच्या थंडीतही मॅरेथॉन स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी धावणा-या लताबाई करे यांना दोन दिवसांत देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. दै. ‘दिव्य मराठी’ने दि. 21 रोजी लता करे यांची करुण कहाणी प्रसिद्ध केली होती. भारतीय स्टेट बँकेत सोमवारी लताबाईंचे बँक खाते (क्रमांक 33532974361) उघडण्यात आले.
गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात 81 हजार 353 रुपये जमा झाले आहेत. दानशूरांनी शंभरपासून ते दहा हजारांपर्यंत मदत दिली आहे. यासाठी लताबाईंनी दै. ‘दिव्य मराठी’चे आभार मानले आहेत. मोठा खर्च लागल्यास रकमेचा वापर केला जाईल, असे लताबाईंनी सांगितले.