आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 87th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Moto Inaugurated In Pune

87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे पुण्‍यात अनावरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - 87 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण शुक्रवारी करण्यात आले. संमेलनस्थळाची परंपरा, संस्कृती, संतसंस्कार हे सारे सामावणारे चित्रकार रोहिदास पवार यांनी रेखाटलेल्या या बोधचिन्हाचे अनावरण मसापचे प्रमुख विश्वस्त भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या संकेतस्थळाचे (abmss-saswad.com) उद्घाटन साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते, प्रकाश पायगुडे, सुनील महाजन उपस्थित होते.