आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 87th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan To Be Held At Saswad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन सासवडमध्‍ये रंगणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवडमध्ये होणार आहे. आचार्य अत्रेंच्या सासवडमध्ये सारस्वतांचा मेळा रंगणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने आज हा निर्णय घेतला.

यंदाचे साहित्‍य संमेलन 87 वे आहे. सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान आणि पिंपरी-चिंचवड येथील लेखक-कवींच्या समूहाने दिलेले निमंत्रण महामंडळाकडे आले होते. मात्र साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार फक्त नोंदणीकृत संस्थेकडून आलेले निमंत्रणच ग्राह्य धरले जाते. या निकषानुसार पिंपरीतून आलेले निमंत्रण अवैध ठरले. त्यामुळे घाईघाईने पिंपरी-चिंचवडकरांनी मसापच्या शाखेकडून निमंत्रण सादर केले, पण आगामी निवडणुकीची आचारसंहिता त्यात अडसर ठरू शकली असती. अखेर दुसरा पर्यायच नसल्‍यामुळे महामंडळाने सासवडवर शिक्‍कामोर्तब केले.

सासवड ही मराठी साहित्य क्षेत्रातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व असलेल्या आचार्य अत्रे यांची जन्मभूमी आहे. त्यामुळे सासवडलाच संमेलन व्‍हावे, ही अनेकांची इच्‍छा होती. चिपळूणमध्ये 87वे साहित्य संमेलन पार पडले होते.