आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 87th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan Declared

87 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची रूपरेषा जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सहा परिसंवाद, दोन प्रकट मुलाखती, तीन कविसंमेलने, कथाकथन व अभिवाचन, बालआनंद मेळावा, लेखक-प्रकाशक सत्कार, ग्रंथप्रदश्रन आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशी भरगच्च कार्यक्रमपत्रिका साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी येथे जाहीर केली. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाशी निगडित कार्यक्रमांची रचना संमेलनात केली असल्याचे स्वागताध्यक्ष विजय कोलते आणि साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकारांना सांगितले.
तीन ते पाच जानेवारीदरम्यान सासवड येथे पालखीतळ जागी 87 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर आणि मसाप सासवड शाखा यांनी संमेलनाचे आयोजन केले आहे.