आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 87th Marathi Sahitya Samelaan Kumar Ketkar Speak On Narendra Modi & Narendra Dabholkar

गुजरात दंगलीनंतर फॅसिस्टवादी वृत्ती फोफावली - कुमार केतकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सासवड (पुणे) - नरेंद्र मोदींसारख्या फॅसिस्टवादी नेत्यांचा एकीकडे उदय झाला आहे तर दुसरीकडे पुरोगामी विचारांना पुढे नेणा-या नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली आहे. एकूणच समाजात फॅसिस्टवादी वृत्ती रूजू लागली आहे. तसेच ही वृत्ती 2002च्या गुजरात दंगलीनंतर अधिक फोफावू लागली असल्याचे परखड मत ज्येष्ठ विचारवंत व दैनिक 'दिव्य मराठी'चे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी व्यक्त केले.
सासवड येथील संत सोपाननगरीत 87 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. आज संमेलनाचा दुसरा दिवस आहे. दुस-या दिवशी पहिलाच कार्यक्रम ज्येष्ठ विचारवंत व संपादक कुमार केतकर यांच्या प्रकट मुलाखतीने सुरु झाला. संतोष शेणई आणि शुभदा चौकर यांनी घेतलेल्या या मुलाखतीवेळी सभामंडपात हजारो नागरिक व साहित्य क्षेत्रातील मंडळी हजर होती. यावेळी बोलताना केतकर यांनी मोदींचा उदय व दाभोलकरांची हत्या यांची सांगत घालत समाजात फॅसिस्टवादी वृत्ती आणि प्रवृत्ती कशी फोफावत चालली आहे यावर भाष्य केले.
केतकर म्हणाले, महाराष्ट्र ही पुरोगामी विचारांची व संताची भूमी आहे. पुणे हे त्यातीलच एक महत्त्वाचे ठिकाण आहे. पण याच पुण्यात नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली. दाभोलकरांची हत्या ही महाराष्ट्रासाठी लज्जास्पद बाब आहे. आता ही हत्या कोणी केली व का केली याची माहिती पुढे आली नसली तरी ती कोणी घडवून आणली असेल ते सर्वांनाच माहित आहे.
2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलीनंतर देशात व एकूणच समाजात फॅसिस्टवादी प्रवृत्ती वाढीस लागली आहे, वाचा पुढे...