आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 88 Th Akhil Bharatiya Marathi Sahitya Samelan, Ghuman Special Train Photo

PHOTOS: घुमान विशेष रेल्वेच्या प्रत्येक डब्याला प्रख्यात मराठी लेखकाचे नाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(घुमान विशेष रेल्वेतून)- पंजाबमधील घुमान येथे सुरू होणार्‍या 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्याहून विशेष रेल्वे न‍िघाली आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारास रेल्वेने घुमानकडे प्रस्तान केले. दरवेळी साहित्य संमेलनांमध्ये प्रवेशद्वार, परिसंवादाचे सभागृहाला प्रख्यात साहित्यिकांचा नावे दिलेली आपल्याला दिसतात. यंदा मात्र घुमानला निघालेल्या विशेष रेल्वेच्या प्रत्येक डब्याला साहित्यप्रेमींनी महाराष्ट्रातील प्रख्यात लेखकाची नावे दिली आहे. तसेच घुमानला निघालेले साहित्यप्रेमी पारंपरिक वेशभुषेत आले आहेत.
मुंबई आणि नाशिक येथून एक एप्रिल रोजी घुमानसाठी निघणार्‍या दोन विशेष रेल्वे गाड्यांच्या एकूण 36 डबे आहेत. दोन्ही रेल्वे गाड्यांच्या डब्यांना मराठी साहित्यिकांची नावे देण्यात आली आहेत. प्रवासादरम्यान रसिकांना या साहित्यिकांच्या पुस्तकांचा आस्वाद घेता येणार आहे.
डब्यांना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, ह. ना. आपटे, वि. दा. सावरकर, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, प्र. के.अत्रे, आ. रा. देशपांडे (कवी अनिल), वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत, गो. नी. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, शंकरराव खरात, दया पवार, नारायण सुर्वे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, श्री. ना. पेंडसे, जयवंत दळवी, विंदा करंदीकर, केशव मेश्राम, विजय तेंडुलकर, जी. ए. कुलकर्णी, अण्णा भाऊ साठे, इंदिरा संत, बहिणाबाई चौधरी, ग्रेस, शिवाजी सावंत, सुरेश भट, बाबूराव बागूल, बा. भ. बोरकर, विभावरी शिरूरकर, बाबा कदम, हमिद दलवाई आणि नामदेव ढसाळ यांची नावे देण्यात येणार आहेत.
(घुमान साहित्य संमेलनाच्या ताज्या घडामोडी वाचकांना मिळाव्यात यासाठी divyamarathi.com चे प्रतिनिधी नितीन सुलताने, दिव्य मराठीचे जयश्री बोकिल आणि अतुल पेठकर घुमानला रवाना झाले आहेत. तेव्हा साहित्य वारीतील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी divyamarathi.com वर राहा लाईव्ह आणि महाराष्ट्रात राहुन अनुभवा घुमान साहित्य संमेलन. वाचा पडद्या मागच्या घडामोडी.)

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, घुमानला निघालेल्या विशेष रेल्वेमधील साहित्यप्रेमी आणि डब्यांना दिलेले लेखकाचे नाव