आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 88 Th Ghuman Marathi Sahitya Samelan Journey Photo Pune

PHOTOS: घुमान स्पेशल रेल्वे 5 तास लेट, पुणे रेल्वे स्थानकावर रसिकांचे शानदार स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - घुमान येथे सुरू होणा-या 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीच्या विशेष रेल्वेने साहित्यिकांना एप्रिल फुल केले. सकाळी साडे पाच वाजता पुणे स्थानकावर रेल्वेचे आगमन होणार होते, या रेल्वेला तब्बल पाच तास उशिर झाला. पहाटेपासून स्थानकात आलेल्या साहित्यिक आणि साहित्य रसिकांना साडे नऊ वाजेपर्यंत ताटकळत उभे राहावे लागले. आमच्या प्रतिनिधींनी कळविल्यानुसार साडेनऊ वाजता रेल्वेने स्थानकात प्रवेश केला. साधारण 10 वाजताच्या दरम्यान रेल्वे पंजाबमधील घुमानकडे रवाना झाली.
सगळेच आलबेल
पहाटे साडेपाच वाजताच्या निर्धारित वेळेपेक्षा तब्बल पाच तास उशिराने विशेष रेल्वे पुणे स्थानकात दाखल झाली. दहा वाजता साहित्यिक आणि रसिकांना घेऊन रेल्वे निघाली असली तरी कोणाचे कोणते सीट आरक्षित आहे, कोण कुठे बसणार याची कोणालाच माहिती नाही. मिळेल त्या जागेवर लोक बसत आहेत. यामुळे संमेलनाच्या प्रवासातील गोंधळ उघड झाला आहे.
आता पुणे म्हटले की, वेगळे पण येणारच हेच वेगळेपण जपत घुमान येथे जाणा-या अनेक साहित्यप्रेमींचे स्वागत करण्यासाठी रेल्वेस्थानकावर पायघड्या घालण्यात आल्या होत्या. वाजंत्रीच्या निनादात स्वागत करण्यात येत होते. यावेळी प्लॅटफॉर्मवर 88 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन 2015 घुमान पंजाब असे लिहिलेली विशेष रांगोळी काढण्यात आली होती. अनेक दिंड्यादेखील सहभागी झाल्या होत्या. घुमानला जाणा -यांमध्ये अनेक जण पारंपरिक वेशभुषेत आले होते.
(घुमान साहित्य संमेलनाच्या ताज्या घडामोडी वाचकांना मिळाव्यात यासाठी divyamarathi.com चे प्रतिनिधी नितीन सुलताने, दिव्य मराठीचे जयश्री बोकिल आणि अतुल पेठकर घुमानला रवाना झाले आहेत. तेव्हा साहित्य वारीतील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी divyamarathi.com वर राहा लाईव्ह आणि महाराष्ट्रात राहुन अनुभवा घुमान साहित्य संमेलन. वाचा पडद्या मागच्या घडामोडी.)
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पुणे रेल्वे स्थानकावरील घुमानला जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी करण्यात आलेली तयारी...