आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनाचे आज सूप वाजणार; जावेद अख्तर, नितीन गडकरींची उपस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी-चिंचवड, पुणे: 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. आज सायंकाळी 5 वाजता होणा-या समारोपाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर आणि मराठी भाषा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आदी पाहुणे हजेरी लावणार आहेत.
गेली तीन दिवस पिंपरी-चिंचवडनगरी साहित्यमय झाली आहे. संमेलन भव्य-दिव्य भरवले गेले. साहित्यिक, रसिक, ग्रंथदालने आदींसह सर्वांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे सर्वत्र या भव्य-दिव्यतेचे कौतूक होत आहे. मात्र, यंदाच्या या संमेलनाला वादाची किनार राहिली. संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वक्तव्य केल्यानंतर काही दिवस वाद पेटत राहिला. शेवटी तो पीडी पाटलांनी मिटवला तरी त्याचे पडसाद संमेलनात दिसून येत होते. सबनीस यांना खास सुरक्षा पुरविण्यात आली. त्यांच्या मागे-पुढे चार-पाच बॉऊन्सर कायम होते. सबनीस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करू नये यासाठी सर्वांनी त्यांना बजावले होते. सबनीस यांनी बेताचेच भाषण केले. मात्र, महामंडळाने करंटेपणा करीत त्यांचे लिखित भाषण छापले नाही, त्यामुळे चर्चा रंगल्या.
गेली दोन दिवस इतर कार्यक्रम दर्जेदार पद्धतीचे झाले. नागरिक, रसिकांनी गर्दी केल्याने स्वागताध्यक्षांचा हेतू साध्य झाल्याचे दिसून आले. मात्र, रविवारी रात्री आशा भोसले यांच्या संगीत रजनी कार्यक्रमादरम्यान वाद झाला. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर काही वेळाने आशा भोसले यांनी मिडियाला बाहेर काढा, ते येथे आलेच कसे असे भाष्य करून हे लोक बाहेर गेल्या खेरीज मी कार्यक्रम सादर करणार नाही अशी भूमिका घेतली. तसेच त्या मंच सोडून गेल्या. यानंतर पत्रकारांनी या निर्णयाच्या विरोधात घोषणा दिल्या. अखेर आशा भोसले व स्वागताध्यक्ष पीडी पाटील यांनी माफी मागितली व वादावर पडदा पडला.
आज काय होणार संमेलनात?
- 12 वाजता- चेतन भगत यांच्याशी संवाद
- 12 वाजता- आजची तरूणाई काय वाचते, काय लिहते परिसंवाद
- 12 वाजता- श्रमिक महिलांच्या व्यथा, लेखकांच्या कथा
.............
- 2.30 वाजता- मुलांचा आनंदोत्सव, बालआनंद मेळावा
- 2.30 वाजता- मराठी वाड्मय क्षेत्रातील पुरस्कारांचे सामाजित व सांस्कृतिक स्थान
- 2.30 वाजता- 1980 नंतरची मराठी कविता स्त्रीकेंद्रित आहे?
- 2.30 वाजता- अभिरूचीसंपन्न विनोद आणि आजचे मराठी साहित्य
.........
- सायंकाळी 5 वाजता- समारोप कार्यक्रम
- रात्री 7.30 वाजता- अशोक हांडे निर्मित मंगलगाणी-दंगलगाणी सांगितिक कार्यक्रम