आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएमपीएमएल बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात; 9 जण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.
पुणे- कात्रज येथून महाराष्ट्र हौसिंग बोर्डाकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. सकाळी 11 च्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावर साईबाबा मंदिराजवळ हा अपघात झाला. सर्व जखमी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ब्रेक निकामी झाल्याने झाला अपघात
- पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार  बस नंबर एमएच 12 AJ 0574 चा ब्रेक फेल झाला होता.
- ही बस कात्रज येथून महाराष्ट्र हौसिंग बोर्डाकडे चालली होती. पुणे-सातारा रोडवर साईबाबा मंदिराजवळ आल्यावर सकाळी अकराच्या सुमारास या बसचे ब्रेक फेल झाले.़
- अपघातात जखमी झालेल्यावर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
- अपघातग्रस्त बस ही 20 वर्षाहून अधिक जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. 
बातम्या आणखी आहेत...