आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात मुलींवरील अत्याचारात 90% वाढ; यवतमाळमध्ये सर्वाधिक गुन्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्यात सन २०१४ या वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ झाली असून सर्वाधिक गुन्हे मुंबई शहरात (३८९५) दाखल झाले अाहेत. राज्यात या गुन्ह्यांचे प्रमाण (दर एक लाख स्त्री लाेकसंख्येस) ४७.५५ टक्के एवढे असून सर्वाधिक गुन्ह्यांचे प्रमाण यवतमाळ जिल्ह्यात घडले अाहेत. तसेच अठरा वर्षाच्या अातील बालिकांवरील बलात्कारात सन २०१३ च्या तुलनेत सन २०१४ या वर्षात ९०.१९ वाढ झाल्याची धक्कादायक बाब राज्य गुन्हे अन्वेष्ण विभागाच्या ‘महाराष्ट्रातील गुन्हे-२०१४’ या अहवालातून समाेर अाली अाहे.

महिलांवरील अत्याचाराचे ९२ टक्के गुन्हे विविध न्यायालयात अद्याप प्रलंबित असून राज्यात भारतीय दंडविधान संहिता कलमनुसार प्रति दाेन िमनिटास एक तर विशेष अाणि स्थानिक कायद्याप्रमाणे प्रति चार िमनिटास एक गुन्हा दाखल हाेत अाहे. दर तीन मिनिटास सरासरी राज्यात दाेन दखलपात्र गुन्हे दाखल अाहेत. सायबर गुन्ह्यात सन २०१४ मध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०७ टक्क्यांनी माेठी वाढ झाली असून भादंविनुसार गुन्ह्यांचे सर्वाधिक प्रमाण नागपूर शहरात अाहे. दराेडा, दराेड्याची तयारी, अनुसूचित जाती-जमातीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ झालेली असून जबरी चाेरीच्या गुन्ह्यात घट झालेली अाहे.एकूण भा.दं.वि गुन्ह्यांपैकी ६१ टक्के गुन्ह्यात तपास पूर्ण करण्यात अाला असून त्यापैकी ६५ टक्के गुन्ह्यात दाेषाराेपपत्र न्यायालयात पाठविण्यात अाले अाहे. राज्यात गुन्ह्यांचे सिद्ध करण्याचे प्रमाण १९.३ टक्के इतके अत्यल्प अाहे.

जमावाच्या हल्ल्यात ३१% पाेलिस जखमी
सन२०१४ मध्ये कर्तव्यावर असलेल्या एकूण जखमी पाेलिसांपैकी ३१.५७ टक्के पाेलिस बेकायदेशीर जमावाने केलेल्या हल्ल्यात जखमी झाले. २०१४ मध्ये राज्यात १६,३०७ व्यक्तींनी अात्महत्या केल्या असून १३,५२९ व्यक्ती रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले. याच वर्षी २० हजार २८४ वाहने चाेरीस गेलेली असून २३ टक्के वाहने परत मिळाली, तर लाेकसंख्येमागे सर्वात कमी ६४ पाेलिस पुणे ग्रामीण, ६७ पाेलिस नगर तर ७१ पाेलिस काेल्हापूर विभागात प्रत्यक्ष कार्यरत हाेते.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारी राेखा
राज्यातील वाढते पांढरपेशी (व्हाइट काॅलर) सायबर गुन्हे राेखण्यासाठी पाेलिसांनी अाधुनिक तंत्रज्ञानाचा वापर रोखण्यास प्रयत्न केले पाहिजेत. महाराष्ट्र ‘सीसीटीएनएस’ प्रणालीचा वापर करणारे पहिले राज्य असून अशाप्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यास केला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केले. ‘क्राईम इन महाराष्ट्र २०१४’ ‘अाॅपरेशन मुस्कान’ या पुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी ते बाेलत हाेते. राज्याचे अपर मुख्य सचिव (गृह) के.पी.बक्षी, पाेलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, पुण्याचे पालकमंत्री िगरीश बापट, महापाैर दत्तात्रय धनकवडे, सीअायडीचे अपर पाेलिस महासंचालक संजय कुमार व्यासपीठावर उपस्थित हाेते. क्राईम सांख्यिकी अहवालाचा वापर हा पाेलिस कार्यपध्दती सक्षम करण्यासाठी झाला पाहिजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले.