आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९०वे अखिल मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नव्वदावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली येथे घेण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला. मात्र संमेलनस्थळाची अधिकृत घोषणा नागपूर येथेच करणार, असा हट्ट महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी धरल्याने आयोजक मंडळी तसेच स्थळनिवड समिती सदस्यांची चांगलीच पंचाईत झाली. मंगळवारी नागपूर येथे संमेलनस्थळासोबत अध्यक्षपद निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला जाणार आहे.

डोंबिवलीच्या आगरी यूथ फोरम संस्थेचे निमंत्रण महामंडळाने स्वीकारले आणि यापूर्वी कधीच डोंबिवलीत संमेलन झाले नाही, या निकषावर संमेलन डोंबिवलीकरांना दिले. बेळगावात सध्या वातावरण अशांत आहे. त्यामुळे डोंबिवलीची निवड झाली, असे सूत्रांनी सांगितले. बेळगावसाठी विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधी प्रचंड आग्रही होते.
बातम्या आणखी आहेत...