आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन बडोद्यातच होणार- घोषणेची केवळ औपचारिकाताच बाकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम या संस्थेने यंदाचे 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यास असमर्थता दाखविल्यानंतर हे संमेलन आता बडोद्यात होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. बडोद्याच्या ठिकाणाची आता केवळ घोषणेची औपचारिकताच बाकी असल्याचे मानले जात आहे.  
 
हिवरा आश्रमबाबत अंनिसने काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या संस्थेने संमेलन आयोजित करण्यास असमर्थता दाखवली. त्यानंतर महामंडळाने मागील दोन दिवसापासून बडोद्यातील आयोजक दिलीप खोपकर यांच्याशी संपर्क साधला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप खोपकर यांनी संमेलनाचे यजमानपद स्वीकारण्यास होकार दिला आहे. त्यामुळे इतर काही बाबींचा आढावा घेतल्यानंतर बडोदा शहरात संमेलन होत असल्याची घोषणा केली जाईल. 
 
एक-दोन दिवसात आयोजक व साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांची चर्चा झाल्यानंतर याची घोषणा केली जाणार असल्याचे कळते आहे.  त्यामुळे बडोदा शहरात संमेलन होत असल्याची केवळ आता औपचारिकताच बाकी असल्याचे मानले जात आहे. महामंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी यासंबंधीचा निर्णय महामंडळाच्या बैठकीतच होईल, असे म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...