आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीएससीच्या अायएफएस परीक्षेत महाराष्ट्रातील 16 जणांची निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- यूपीएससी  घेण्यात अालेल्या इंडियन फाॅरेस्ट सर्व्हिस (अायएफएस) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. यात महाराष्ट्रातील १६ उमेदवारांसह देशभरातील ११० उमेदवारांची निवड झाली. निरंजन दिवाकर याने तिसरी रँक मिळवत राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला अाहे.    


सुमीतकुमार पाटील (सातवी रँक), काजल पाटील (११ रँक), श्रीनिवास पाटील (२८), संदीप सूर्यवंशी (३८), निखिल थावल (४६), सुदर्शन जाधव (४७), कस्तुरी सुळे (५६), राहुल जाधव (६८), प्रशांत पाटील (६९), अमित शिंदे (७३), सतीश गाेंधळी (७९), अक्षय बाेराडे (९५), शशांक माने (१००), राहुल गजभिवे (१०२) व स्वरूप दीक्षित (१०९ रँक) हे महाराष्ट्रातील उमेदवार निवडले गेले अाहेत.   


काेल्हापूरच्या काजल पाटील हिने सांगितले की, चरण (जि. काेल्हापूर) गावात माझे प्राथमिक शिक्षण झाले. राहुरी येथील कृषी विद्यापीठमधून एमएस्सी अॅग्रीपर्यंत मी शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अायएफएस परीक्षा दिली. अॅग्री इंजिनिअरिंग अाणि फाॅरेस्ट्री हे दाेन विषय परीक्षेकरिता मी निवडले हाेते. सदर परीक्षेकरिता जुन्या प्रश्नपत्रिका साेडवणे, लिखाणावर भर देणे, गटचर्चा अाणि मुलाखतीची विशेष तयारी करणे या गाेष्टींवर भर दिला.

बातम्या आणखी आहेत...