आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल कायदाशी संबंधित \'अन्सार उल बांगला\' संघटनेचे तीन बांगलादेशी पुण्यात अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.

पुणे- बांगलादेशमधील ‘अन्सार उल बांगला’ या अतिरेकी संघटनेतील सदस्यांशी संपर्कात अाणि अवैधरीत्या घुसखाेरी करून भारतात अालेल्या माेहंमद हबीबउर रहमान हबीब ऊर्फ राज जेसुब मंडल (३१), माेहंमद रिपन हाेस्सैन ऊर्फ रुबेल (२४) व हानन्न अन्वर खान उर्फ हानन्न बाबुरली गाझी (२८) या ३ बांगलादेशींना पुणे एटीएसने अाकुर्डी व वानवडी परिसरात अटक केली. अल-कायदा या अतिरेकी संघटनेशी त्यांचा संबंध असल्याचा संशय आहे. सत्र न्यायालयाने त्यांना २९ मार्चपर्यंत काेठडी सुनावली. 


वानवडीत संवेदनशील अास्थापनेजवळ पहिल्या संशयितास अटक केली. त्याच्या माहितीवरून अाकुर्डीतून २ जणांना अटक केली. ते ५ वर्षापासून येथे राहत हाेते.


दहशतवाद्यांना लपून राहण्यास मदत 
एटीएसचे सहा. पोलिस अायुक्त सुनील दरेकर म्हणाले की, ‘अन्सार उल बांगला’ ही भारतात बंदी असलेली अल-कायदाची सहकारी संघटना आहे. या संघटनेतील 
सक्रिय सदस्यांची भारतात लपून राहण्याची व्यवस्था ते करत हाेते. लष्कराच्या गुप्त विभागाने याकामी मदत केली.

 

बनावट आधार-पॅन कार्डही
या संशयितांनी भारतात खाेटी नावे धारण करून बनावट अाधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड तयार केली अाहेत. तसेच त्यांच्याकडून माेबाइल फाेन्स, सिमकार्ड््स व तयार केलेली बनावट कागदपत्रे जप्त करण्यात अाली अाहेत.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...