आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्स अॅपवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याने केली आत्महत्या; होते हे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- किराणा दुकानातील चॉकलेटची बरणी चोरी करतानाचा व्हिडिओ व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याने एका 45 वर्षांच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील दोंदे गावात घडली.

 

 

दोंदेगावात राहणाऱ्या विठ्ठल विष्णू बारणे (वय 45) एक व्हिडिओ व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाला. बारणेने एका किराणा दुकानातून चॉकलेटची बरणी चोरली होती. हा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ अवघ्या काही दिवसांमध्येच व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाला. व्हिडिओत बारणेचा चेहरा दिसत असल्याने गावात त्याची नाचक्की झाली. यामुळे विष्णू बारणे यांनी गावातील स्मशानभूमीवजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्याचा भाऊ संतोष बारणे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...