आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणावळ्याजवळ 2 कारचा भीषण अपघात, 7 ठार, दोन गंभीर; चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - जुन्या पुणे मुंबई महामार्गावर एका भीषण अपघात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा तर सहा पुरुषांचा समावेश आहेत. दोन जण गंभीर जखमी असल्तयाची माहिती मिळाली आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास कार्ला फाट्या जवळ हा अपघात झाला. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅन्ट्रो आणि स्विफ्ट कारमध्ये समोरासमोर धडकून झालेल्या या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. स्विफ्ट कार मुंबईच्या दिशेने जात होती, तर सॅन्ट्रो पुण्याच्या दिशेने. भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक ओलांडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर जाऊन सेन्ट्रो गाडीला समोरून जोरदार धडकली. या भीषण अपघातात सॅन्ट्रो मधील दोन तर स्विफ्ट मधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. स्विफ्ट मध्ये लहान मूल असल्याची माहिती मिळत आहे.

 

मृतांची नावे अशी

संजीव मोहनसिंग कुशवाह (वय 17), रा. अमरदीप काॅलनी, रहाटणी पुणे), कृष्णा रमेश शिरसाट (22),निखिल बालाजी सरोदे (20),राजीव जगन्नाथ बहिरट (52), सोनाली राजीव बहिरट (46), जान्हवी राजीव बहिरट (20), जगन्नाथ चंद्रसेन बहिरट (23, सर्व राहणार मुंढवा पुणे). अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांना कान्हे फाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रतिक सरोदे (18), आकाश मदने (17), आणि रोहित कड (16) अशी त्यांची नावे आहेत.


 

बातम्या आणखी आहेत...