आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात निगडी येथील ओटा स्कीम वसाहतीत वाहनांची तोडफोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- निगडी येथील ओटा स्कीम वसाहतीत रविवारी मध्यरात्री 7 वाहनांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटा स्कीम येथील गुरुदत्त हौसिंग सोसायटीच्या पार्किंगमधील 7 वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. यामध्ये चार चारचाकी आणि तीन ऑटो रिक्षांचा समावेश आहे. घटना घडल्यानंतर स्थानिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला याप्रकरणी माहिती दिली. माहिती मिळताच निगडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...