आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील 9 पर्यटकांकडून गोव्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अशी काढली 'छेड'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी/पुणे- गोव्यात फिरायला गेलेल्या पुण्यातील 9 पर्यटकांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. या मुलीचा विनयभंग केल्याचा जाब विचारल्याने तिच्या अल्पवयीन भावालाही या पर्यटकांनी मारहाण केली. गोव्यातील प्रसिद्ध कलंगुट बीच परिसरात हा प्रकार घडला. दरम्यान, या पर्यटकांविरोधात तक्रार देताच त्यांना अटक करण्यात आली आहे. 

 

संकेत भडाले, कृष्णा पाटील, अनिकेत गुरव, ऋषिकेश गुरव, आकाश सुवसकर, सनी मोरे, रमेश कांबळे, सत्यम लांबे आणि ईश्वर पंगारे (रा. पुणे, पत्ता माहित नाही) अशी अटक केलेल्या पर्यटक तरूणाची नावे आहेत.

 

याबाबतची माहिती अशी की, पुण्यातील 11 पर्यटक गोव्यात दोन दिवसापूर्वी फिरायला गेले होते. मंगळवारी 29 मे रोजी हे पर्यटक कलंगुट बीचवर पोहचले होते. त्याचवेळी तेथे एक अल्पवयीन मुलगी आपल्या भावासमवेत फिरायला आली होती. समुद्रकिनारी फिरत असताना आरोपी पर्यटकांनी या मुलीशी छेडछाड सुरू केली. विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिचे फोटो व व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये घेऊ लागले. हा प्रकार तिच्या भावाच्या लक्षात येताच त्याने या प्रकाराबद्दल त्यांना जाब विचारण्यास केली. त्यावरून मुलीच्या अल्पवयीन भावालाही पुण्याच्या या पर्यटकांनी मारहाण करत वाद घातला. मुलीच्या भावाला जबर मारहाण केल्यानंतर अल्पवयीन मुलगी व तिच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली.

 

हा प्रकार घडल्यानंतर आरोपी पर्यटक तातडीने गोव्यातून पुण्याकडे निघण्याच्या तयारीत होते. मात्र, गोवा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत कलंगुट परिसरात कारवाई करत आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींना अटक करताच मुलीचे फोटो काढले होते ते मोबाईल जप्त केले. आरोपी पर्यटकांपैकी 2 जण अल्पवयीन आहेत. 

बातम्या आणखी आहेत...