आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारापूर: रासायनिक कंपनीत भीषण स्फोट; 3 कामगार मृत्‍यूमुखी, 6 कंपन्‍या आगीत खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालघर- पालघर जिल्ह्यातील तारापूर अाैद्याेगिक वसाहतीतील नाेवाफेना या रासायनिक कंपनीत गुरुवारी मध्यरात्री 11.30 च्या सुमारास लागलेल्या भीषण अागीत 3 कामगारांचा मृत्‍यू झाला आहे. आरती इंडस्‍ट्रीज साइटमध्‍ये तिघांचे मृतदेह सापडले आहेत. त्‍यांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. या भीषण आगीत 13 कामगार गंभीर जखमी झाल्‍याची माहिती आहे.


सुरुवातीला या कंपनीत अाग लागली अाणि एका पाठाेपाठ एक असे अनेक स्फाेट झाले. त्यामुळे सुमारे १५ किलाेमीटरचा परिसर हादरून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या भीषण अागीने शेजारच्या अारपी ड्रग्ज व प्राची फार्मास्युटिकल या दाेन कंपन्यांसह सहा कंपण्‍यांना कवेत घेतले, यात काेट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या तीनही कंपन्यांतील रात्रपाळीत काम करणारे काही कामगारही अागीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात अाहे. शेजारच्या नागरी वसाहतींनाही या स्फाेटाची झळ पाेहाेचली. काही घरांच्या भिंतीना, खिडक्याच्या काचांना तडे गेल्याचे सांगितले जाते. भीतीपाेटी नागरिक घरदार साेडून माेकळ्या जागेत येऊन थांबले हाेते. अग्निामक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत असूनही रात्री उशिरापर्यंत अाग अाटाेक्यात अाणण्यात यश अाले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...