आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतिचा आदेश- पोळीचा व्यास 20 सेंटीमीटरच हवा, पत्नीची कोर्टात धाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पोळी बनवण्याच्या कारणावरून एका महिलेने घटस्पोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे. पोळीचा व्यास 20 सेमीच असावा असा अशी मागणी पतिने केल्याने पत्नीने पतिविरोधात कौटुंबीक हिंसाचाराच्या प्रकरणात तक्रार केली आहे. पत्नीने सांगितले की, पोळीचा व्यास 20 सेमी नसला तर पती शिवीगाळ आणि मारहाण करतो. या हिंसेला कंटाळून तिने घटस्पोटासाठी अर्ज दाखल केला आहे.


महिलेने सागितले की, दहा वर्षांपूर्वी 2008 मध्ये तिचे लग्न झाले. आटी क्षेत्रात काम करणारा पतिची प्रत्येक बाबतीत तिने अतिसुव्यवस्थीत असावे अशी अपेक्षा असते. दिवसभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा एका सीटवर वेगवेगळ्या रंगात लिहून ठेवावा अशी त्याची अपेक्षा असते. जर ठरवलेले काम झाले नाही, तर ते का नाही झाले याचे कारण लिहूण ठेवण्यासाठी देखील वेगळा कॉलम तयार केला आहे. जर एखादा कॉलम रिकामा राहिला तर, पति शिविगाळ, अपमान आणि मारहाण करतो. रोज केलेल्या पोळीचा व्यास बरोबर आहे की नाही हे देखील रोज मोजून पाहतो असे आरोप पत्नीने केले आहेत.


मुलीमुळे जिव देखील नाही देऊ शकत...
पत्नीने सांगितले की, पति तिच्या अंगावर थंड पाणी टाकून एसी असलेल्या खोलीत बंद करतो. मी आत्महत्या करावी यासाठी त्याने अनेकवेळा दबाव देखील टाकला. परंतु, मला एक मुलगी आहे आणि तिचा विचार मनात येतो त्यामुळे मी आत्महत्या देखील करू शकत नाही आणि जगू ही शकत नाही.