आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडा शर्यतीची 'रेस': पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाडा मालकांनी बैल बांधले!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पेटा संस्था व ढोंगी प्राणीमित्र बैलगाडा शर्यतींना जाणीवपूर्वक विरोध करत आहेत, असा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने आजपासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत राज्यव्यापी आंदोलनाला सुरूवात केली. या आंदोलनाला भोसरीचे भाजप समर्थक अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.

 

या आंदोलनात राज्यातील बैलगाडा मालक आपल्या बैलजोड्यासह सहभागी झाले आहेत. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर व रायगड जिल्ह्यातील शेतकरी आपल्या सर्जा-राजा जोडीसह आंदोलन करत आहेत.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या आंदोलनाचे फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...