आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात जुन्नरमध्ये मधमाशांचा शाळकरी मुलांवर हल्ला; 8 जण जखमी. विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शंकरराव बुट्टे पाटील इंग्रजी माध्यम शाळेतील 22 विद्यार्थी आग्या मोहळातील माशांनी हल्ला केल्याने जखमी झाले आहेत. त्यातील आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाळा सुटल्यानंतर शाळेच्या संरक्षक भिंतीबाहेर असलेल्या शहर पाणीपुरवठ्याच्या शंभर फूट उंचीच्या पाण्याच्या टाकीवरील आग्या मोहळातील माशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला चढविला. 

 


माशांच्या हल्ल्यामुळे विद्यार्थी सैरावरा पळत सुटले. शाळेच्या परिसरात असलेल्या अशा धोकादायक आग्या मोहळांना काढून टाकण्यासाठी नगरपालिकेने तत्परतेने लक्ष द्यावे, अशी मागणी या निमित्ताने पालकांनी केली आहे. दरम्यान, पीडित मुलांचे डोके, तोंड या भागास दंश झाल्याची माहिती समजताच शाळेतील शिक्षक सदानंद उकिर्डे, शिपाई अंकुश लोखंडे, दिनेश गायकवाड, राजेंद्र रोकडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मुलांच्या अंगावरील माशा काढल्या, तर विद्यार्थ्यांना खासगी; तसेच जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...