आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालय परिसरात एकबोटेला काळे फासण्याचा प्रयत्न, पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेला सोमवारी न्यायाधीश कक्षाच्या बाहेरच्या बाजूला काळे फासण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न यशस्वी झाला नसला तरी थेट न्यायालयाच्या आवारात असा प्रसंग घडल्याने काही काळ खळबळ उडाली. याप्रकरणी संजय हरिदास वाघमारेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, एकबोटेला न्यायालयाने २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.     


मिलिंद एकबोटेंवर शाई फेकण्याचा प्रयत्न करणारा तरुण संजय हरिदास वाघमारेवर २०१० मध्ये शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये स्त्रिया आणि आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंद आहे. त्याचबरोबर बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्येही फोर्जरीचा गुन्हा नोंद आहे. संजय वाघमारेला सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि धक्काबुक्की करणे या गुन्ह्यांत शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, मिलिंद एकबोटेला १९ मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यावर सोमवारी त्याला पुन्हा न्यायालयासमोर सादर करण्यात आले.  १ जानेवारीला कोरेगाव भीमात घडलेल्या दंगलीत शेकडो वाहने, मालमत्तेची जाळपोळ करण्यात आली. यात एकाचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले होते. या घटनेचे पडसाद राज्यभरातही उमटले होते.  

बातम्या आणखी आहेत...