आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भिमा दंगल प्रकरण: प्रमुख आरोपीमिलिंद एकबाेटेला 4 दिवसांची काेठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काेरेगाव-भीमा दंगलप्रकरणी अटक करण्यात अालेला समस्त हिंदू अाघाडीचा कार्याध्यक्ष मिलिंद एकबाेटे याला गुरुवारी न्यायालयात हजर केले. या वेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी दाेन्ही बाजुंच्या वकिलांचा युक्तिवाद एेकून घेऊन एकबाेटेला  १९ मार्चपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.    


याप्रकरणी शिक्रापूर पाेलिस ठाण्यात अनिता रवींद्र सावळे (३९, रा. काळेवाडी, पुणे) यांनी मिलिंद एकबाेटे आणि शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरूजी यांच्याविराेधात फिर्याद दिलेली अाहे.  जयश्री सुदाम इंगळे (रा. अाैरंगाबाद) यांनी या दाेघांसाेबतच अनिल दवे यांच्याविराेधात पोलिसांत तक्रार दिली आहे. 


तर, बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या सुषमा दगडूराव अंधारे यांनी काेरेगाव भीमा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सरपंच गणेशबापू फडतरे अाणि याेगेश नरहरी गव्हाणे या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबाेटेंच्या सांगण्यावरून दंगल घडवल्याची तक्रार दिली अाहे. युक्तिवाद ऐकल्यानंतर एकबोटेला १९ मार्चपर्यंत  पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, एकबोटेला मधुमेह असल्याने वैद्यकीय सुविधा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.   

बातम्या आणखी आहेत...