आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • B'day: डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमारतीत रणबीर कपूरचा फ्लॅट, असे आहे इंडिया कनेक्शन Birthday Special President Donald Trump India Connection Story

B'day: डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमारतीत रणबीर कपूरचा फ्लॅट, असे आहे इंडिया कनेक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जागतिक महासत्ता समजल्या जाणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 14 जून हा जन्मदिन आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी 276 इलेक्टोरल वोट्‍ससह दणदणीत विजय मिळवला. 

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष आहेत. 'उद्योगपती ते अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष' अशी नवी ओळख ट्रम्प यांना मिळाली आहे.

आपल्या बेताल वक्तव्यांनी नेहमीच वाद ओढवून घेणारे डोनाल्ड ट्रम्प हे अब्जावधी संपत्तीचे मालक आहेत. मागच्या 60 वर्षांत बिगर राजकीय अध्यक्ष बनणारे ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

असे आहे इंडिया कनेक्शन...
तुम्हाला कदाचित माहीत नसावे की, ट्रम्प यांचे भारतासोबत जुने नाते आहे. ट्रम्प यांचा रिअल एस्टेट प्रोजेक्ट 'ट्रम्प टॉवर्स' काही वर्षांपूर्वीच महाराष्ट्रातील पुण्यातील कल्याणीनगरात तयार झाला. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसह अनेक सेलिब्रिटीजनी तेथे फ्लॅट घेतले आहेत. एवढेच नव्हे तर कॅम्पेनिंगदरम्यान ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनतेची खूप प्रशंसा केली होती. ट्रम्प यांची सुनेने मंदिरात जाऊन दिवाळी साजरी केली होती. अमेरिकेतील हिंदू कोआलिशनने ट्रम्प यांना भरभरून मते दिल्याचे बोलले जाते. पाकिस्तानला अमेरिकेने मदत बंद करावी या अटीवर हा पाठिंबा तेथील हिंदू मतदारांनी दिला होता.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, पुण्यातील ट्रम्प टॉवर्सची वैशिष्ट्ये.... 

बातम्या आणखी आहेत...