आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या ममता गायकवाड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजप आमदार लक्ष्मण गायकवाड समर्थक माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी नगरसेविका ममता गायकवाड या 7 मतांनी विजयी झाल्या आहेत. गायकवाड यांना एकूण 11 मते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोरेश्वर भोंडवे यांना 4 मते पडली. यावेळी शिवसेना तटस्थ राहिली.

 

 

स्थायी सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने चिठ्ठीद्वारे 8 जण बाहेर निघाले. यामध्ये पहिल्याच चिठ्ठीत स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांचे नाव निघाले होते. 8 पैकी 4 सदस्य हे भाजपचे तर राष्ट्रवादीचे दोन सदस्य बाद झाले होते. त्यानंतर दि. ३ मार्च रोजी स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात आले. भाजपकडून ममता गायकवाड यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे नाराज आमदार महेश लांडगे गटातील सदस्यांचे राजीनामा नाट्य सुरू झाले.

 

 

स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे दावेदार असलेले नगरसेवक राहुल जाधव, विलास मडगीरी, शीतल शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र ऐनवेळी आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या ममता गायकवाड यांचा अर्ज भरण्यात आला. यानंतर भाजपामध्ये नाराजी नाट्य सुरू झाले होते. गायकवाड यांचे नाव जाहीर होताच महापौर नितीन काळजे यांनी तडकापडकी महापौरपदाचा तडकाफडकी राजीनामा भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्याकडे दिला होता. तर नगरसेवक राहुल जाधव, शीतल शिंदे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. याचा फायदा उठवण्यासाठी राष्ट्रवादीकडून मोरेश्वर भोंडवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते. अखेर पक्षश्रेष्ठींनी नाराज लांडगे गटाची समजूत काढली. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी ममता गायकवाड या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुशील खोडवेकर तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून उल्हास जगताप यांनी काम पाहिले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...