आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्याकडे कोट्यवधींची माया; रोकड, पेट्रोल पंप, सोने, फ्लॅट्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरेकडे लाखो रुपयांची रोकड, सोने, पेट्रोल पंप आणि पुणे, सोलापूर या शहरांमध्ये फ्लॅट असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.  मोरेला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंधरा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते व त्याला अटक केली होती. एसीबीने गुरुवारी संध्याकाळी मोरेच्या कार्यालयातचही कारवाई केली.त्यानंतर, मोरेच्या पुण्यातील घरात एसीबीने झडती घेतली. त्यात 38 लाख 33 हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे. त्याचबरोबर, सोनं, पेट्रोल पंप आणि पुणे-सोलापूरमध्ये फ्लॅट असल्याची माहिती एसीबीच्या तपासात पुढे आली आहे. नातेवाईकांच्या नावे मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती जमा केल्याचेही मोरेने एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बेनामी मालमत्तांचा शोध एसीबी घेत आहे.

 


मोरेची खुली चौकशी करण्यात येणार आहे. तसेच, दुपारनंतर मोरे आणि त्याच्या साथीदाराला कोर्टात हजर केले जाणार आहे. श्रीपती मोरे पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक अकरा या पदावर कार्यरत होता. जमिनीच्या वादाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी मोरेने 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील पंधरा हजार रुपये स्वीकारताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...