आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत संस्थेद्वारे फसवणूक एका दिवसात डाॅक्टरची पदवी बहाल करणाऱ्यांचे पितळ उघड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अाैरंगाबाद येथील निसर्ग उपचार बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या नावाने संकेतस्थळ सुरू करून त्याद्वारे लाेकांना एका दिवसात एन.डी. डाॅक्टर ही पदवी देण्याचे सांगून फसवणूक करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले अाहे. काेथरूड येथील अभिषेक हरिदास  यांच्याकडून दहा हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात अाल्याने डाॅ. मच्छिंद्र अागवन यांच्यासह तीन जणांविरोधात कोथरूड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  
मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेवर व उपाध्यक्ष अभिषेक हरिदास यांना ग्रामीण बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था, अाैरंगाबाद यांच्या वेबसाइटवर माहिती मिळाली की, ४० हजार रुपयांत नॅचराे थेरपी डिप्लाेमा (एन.डी.) अभ्यासक्रमाची पदवी तत्काळ घेता येर्इल. एका दिवसात तुमच्या नावाच्या पुढे डाॅक्टर हे बिरुद लावून तुम्ही वैद्यकीय व्यवसाय सुरू करू शकता, असे सांगण्यात अाले हाेते. दरम्यान, हरिदास अागवन यांच्याशी पदवी घेण्याबाबत फाेनवर संपर्क साधला. त्यांनी यासाठी ४७ हजार रुपये लागतील, असे सांगितले. तसेच पदवी घेण्यासाठी औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात बोलावले. मात्र, पदवी न देता फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आगवन यांच्यासह तीन जणांविरोधात तक्रार दिली. दरम्यान, या प्रकरणाचा पोलिस सर्व बाजुंनी तपास करत असल्याचे पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...