आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लटकत असणारा मांजा डोळ्यात घुसल्याने चिमुकला गंभीर जखमी; काळेवाडी येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळेवाडी- रस्‍त्‍यात लटकत असणारा मांजा डोळ्यात घुसल्याने चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. आज सायंकळी साडेपाच वाजेच्‍या सुमारास हा चिमुकला आपल्‍या नातेवाइकासोबत दुचाकी वरूण घरी जात होता. यावेळी ही घटना घडली. घटनेनंतर जखमी मुलाला तातडीने रग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.  त्‍याच्‍यावर उपचार सुरू असून अद्याप त्‍याचे नाव कळू शकलेले नाही.

 

मिळालेल्या माहिती नुसार, हा चिमुकला नातेवाईकसोबत दुचाकीवरून फेरफटका मारायला गेला होता. काळेवाडी येथील राजीवडे नगर येथे रस्त्यावर लटकत असलेल्या पतंगाचा मांजा दुचाकीवर समोर बसलेल्या लहान मुलाच्या दोन्ही डोळ्यात घुसला आणि तो थेट धावत्या दुचाकीवरून खाली पडला. यात मुलाच्या डोळ्याला गंभीर जखम झाली. पोलिसांना तातडीने घटनेची माहिती कळवण्‍यात आली. त्‍या लहाण मुलाला रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. रात्री उशीरा पर्यंत त्‍याचे नाव समजू शकले नाही. 


२५ जानेवारी २०१७ रोजी थेरगाव येथे पतंग उडवताना मांजा विद्युत तारांमध्ये अडकल्याने झटका बसून ५ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. ही घटना थेरगाव मधील पडवळनगर येथे घडली होती.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...