आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशात नोकरीच्या अमिषाने पुण्यातील तरूणाची 12 लाखांची फसवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- परदेशात नाेकरी लावण्याचे अमिष दाखवून याेगेश जाधव (वय- 31, रा. शिवाजीनगर, पुणे) या तरुणाची 11 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक करण्यात अाली अाहे. याप्रकरणी परेश पांडे व कांचन मुदगूल या अाराेपीं विराेधात शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

 

याेगेश जाधव व त्याचे मित्र यांना अाराेपींनी मागील एक वर्षापासून संर्पक साधत त्यांना अमेरिकेतील हाॅटेल माेटल माॅल मध्ये महिन्याला दाेन ते चार लाख रुपये पगाराची नाेकरी लावून देताे असे अमिष दाखविले. तसेच अमेरिका, कॅनडा, न्युझीलंड या देशात हाॅटेलमध्ये महिना अडीच लाख रुपयांची नाेकरी देताे असे सांगितले. 

 

त्यासाठी योगेश जाधवकडून वेळोवेळी 11 लाख 70 हजार रुपये घेवून त्यानंतर त्यांना काेणत्याही प्रकारची नाेकरी न लावता अथवा पैसे परत न करता फसवणूक करण्यात अाली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...