आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपटी औरंग्याने संभाजी महाराजांना असे छळ छळ करून मारले! फितुरीने असा साधला डाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- छत्रपती संभाजी महाराज यांची आज (11 मार्च) पुण्यतिथी आहे. मराठी बांधव संभाजीराजेंचा मृत्यू दिवस बलिदान दिन म्हणून पाळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याच्या लढाईत संभाजी महाराजांनी प्राण पणाला लावले. औरंगजेबाला तर संभाजी महाराजांनी नामोहरम करून सोडले होते. मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि लवाजमा असूनही शंभुराजे औरंगजेबाच्या हातील लागत नव्हते. पण काही फितुरांनी दगा दिली आणि महाराजांना कैद झाली.

 

कदाचित महाराजांसमोर अशा प्रकारे फितुरांचे आव्हान नसते तर, महाराज कधीच औरंगजेबाच्या तावडीत कधीच सापडले नसते. पण फितुरांनी स्वराज्याच्या पाठीत खंजीर खुपसला आणि संभाजी महाराज औरंग्याच्या तावडीत सापडले. त्याच्या मनात संभाजी महाराजांविषयी एवढा राग होता, की त्याने संभाजी महाराजांना वेदना देऊन देऊन ठार करायचे असे ठरवले. त्यासाठी त्याने महाराजांवर अनेक प्रकारे अत्याचार केले.

 

संभाजी महाराजांनी धर्मांतर करावे यासाठी त्याने खूप प्रयत्न केला. पण महाराजांनी धर्मासाठी प्राण त्यागले. 'प्राण गेला तर बेहत्तर पण मी माझा प्रिय धर्म सोडणार नाही' असा निश्चय त्यांनी मनोमन केला. त्यामुळेच औरंगजेबाने शभूराजांची हत्या वयाच्या केवळ 32 व्या वर्षी केली. आणि तो दिवस होता 11 मार्च 1789. त्या दिवसाला आपण बलिदान दिनही म्हटले जते. महाराजांच्या या अंतिम काळात औरंगजेबाने त्यांचा किती छळ केला हे आम्ही तुम्हाला त्यांच्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने सांगणार आहोत.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, कपटी औरंग्याने कसे छळ छळ करून मारले संभाजी महाराजांना...
 

(टीप- विविध इतिहासकारांनी विविध पुस्तकांमध्ये याबाबतचे वर्णन केलेले आहे. त्या सर्वांचा आधार घेऊन ही माहिती आम्ही सादर करत आहोत.)

बातम्या आणखी आहेत...