Home | Maharashtra | Pune | Dinanath mangeshkar hospital news

पुणे: अायसीयूत डाॅक्टरसमक्ष मांत्रिकाचे उपचार, महिला रुग्णाचा मृत्यू

प्रतिनिधी | Update - Mar 14, 2018, 01:27 AM IST

संध्याा सोनवणे (वय 24, दत्तवाडी) असे या महिलेचे नाव आहे तर, मांत्रिकाला बोलवून त्यांच्याकडून उपचार करून घेणा-या डॉक्टरच

 • Dinanath mangeshkar hospital news

  पुणे - दीनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (अायसीयू) डाॅक्टरसमाेरच महिला रुग्णावर मांत्रिकाने उपचार केल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. विशेष म्हणजे डॉक्टरनेच मांत्रिकाला रुग्णालयात बोलावले होते. ११ मार्च राेजी या रुग्णाचा मृत्यू झाला.

  अायसीयूतील मांत्रिकाचा हळदी, कुंकू, गुलाब उताऱ्याचा व्हिडिअाे व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. संध्या गणेश साेनवणे (२५, रा. दत्तवाडी) असे मृत महिलेचे नाव अाहे. संध्याच्या छातीत दुधाची गाठ निर्माण झाल्याने मागील अनेक दिवसांपासून स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग हाेमचे डाॅ. सतीश चव्हाण यांच्याकडे उपचार सुरू होते.

  चव्हाण यांनी उपचार करूनही तब्येतीत सुधारणा होत नसल्याने संध्या यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात अाले. त्या ठिकाणी डॉ. चव्हाण यांनी मांत्रिकाला बाेलावून बहिणीवर उपचार केल्याचा संध्याचा भाऊ महेश जगतापने आरोप केला आहे. “शस्त्रक्रिया करणे गरजेचे असताना डाॅक्टरांनी “ऑपरेशनच्या दिवशी संध्याकाळी ६ ते ८ ही यमाची घंटा असते, त्यामुळे अाॅपरेशन रात्री १० वाजेनंतर करू,’ असे सांगितले. अाेळखीतील मांत्रिक बाेलावून अघाेरी उपचार केले. मात्र, उपचारादरम्यान संध्याचा मृत्यू झाल्याचे भाऊ महेशने म्हटले आहे.’

  डाॅक्टरने मागितले पाेलिस संरक्षण

  २० फेब्रुवारीला डाॅ. शिवाजी विभुते यांनी संध्यावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर तिची तब्येत खालावल्यामुळे डाॅ. विभुते यांच्या सल्ल्याने तिला दीनानाथ रुग्णालयात दाखल केले. २१ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान येथेच तिच्यावर उपचार सुरू होते. आपण अधूनमधून तिला भेट देत होतो. तिची विचारपूस करण्यासाठी दीनानाथ रुग्णालयात गेलो असता तिथे अाेळखीचे पुजारी भेटले. संध्याची विचारपूस करताना तेसुद्धा तिथेच आले. त्यानंतर मी परत आलो. मात्र, ११ मार्च राेजी रुग्णाचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी दीनानाथ रुग्णालयाचे बिल कमी करण्याची विनंती केल्याने मी ते कमी करून दिल्याचे चव्हाण म्हणाले. दरम्यान, या प्रकारानंतर रुग्णालय बंद करण्याची धमकी आल्याचे सांगून डाॅ. सतीश चव्हाण यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.

  दीनानाथ रुग्णालयाचा घटनेशी संबंध नाही
  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डाॅक्टरांचा या घटनेशी संबंध नसून रुग्णालय अशा प्रकारच्या गाेष्टींना थारा देत नाही. व्हिडिअाेत दिसणारे डाॅक्टर रुग्णालयाचे नसून अायसीयूत अशा प्रकारच्या अघाेरी कृत्यांना परवानगी नाही. याप्रकरणी चाैकशी करून दोषींविरोधात कारवाई करू, असे रुग्णालयाने स्पष्ट केले.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...संबंधित घटनेच्या व्हिडिओ...

 • Dinanath mangeshkar hospital news

Trending