आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- 'घराला घरपण देणारी माणसं' अशी जाहिरात करून बांधकाम क्षेत्रात नावलाैकिक मिळवणाऱ्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी हा काेरेगाव पार्क येथील ट्रम्प टाॅवर या अालिशान इमारतीत एका फ्लॅटमध्ये महिना चार लाख रुपये देऊन भाड्याने राहत असल्याचे पाेलिस तपासात उघडकीस अाले अाहे. या फ्लॅटचे भाडे डीएसके माेटर्स प्रा.लि. या कंपनीतून दिले गेले असून अशा प्रकारे ठेवीदारांनी डीएसकेंच्या कंपनीत गुंतवलेल्या काेट्यवधी रुपयांची उधळपट्टी झाल्याचे समाेर अाले अाहे.
शिरीष कुुलकर्णीने लाेणावळ्याजवळील टाकवे बुद्रुक येथे २०११ मध्ये ३६ काेटी रुपयांत २३ एकर जमीन खरेदी केली अाहे. मात्र, ही जमीन स्वत:च्याच डीएसके माेटाेव्हील्स या कंपनीस प्रति महिना ४६ लाख रुपये भाड्याने दिली. अशा प्रकारे त्याने पैशांचा बेकायदेशीरपणे दुरुपयाेग केला अाहे. पत्नी तन्वी कुलकर्णी हिच्या नावावर स्वत:च्या खात्यातून त्याने १२ काेटी रुपये वर्ग केले असून त्याबाबतही काेणतीही माहिती देण्यास ताे टाळाटाळ करत अाहे.
शिरीष याच्या बँक अाॅफ महाराष्ट्रच्या बाजीराव राेड शाखेच्या चालू खात्यावर आई हेमंती कुलकर्णी हिच्या खात्यावरून तसेच इतर कंपन्यांतून १४३ काेटी रक्कम जमा करण्यात अाली. ही रक्कम शिरीषने ताे चालवत असलेल्या डीएसके मोटर्स, डीएसके माेटाेव्हील्स, तलिस्मान हाॅस्पिटॅलिटी सर्व्हिसेस प्रा.लि., डीएसके शिवाजी एन्स फुटबाॅल क्लब प्रा.लि. या कंपन्यांत मोठी रक्कम वर्ग केली असून त्याचा तपशीलही तो देत नाही. तसेच या कंपन्यांना ठेवीदारांच्या रकमेतील एकूण ५१ काेटी रुपये वर्ग केले असून त्याबाबत अधिक चाैकशी तपास यंत्रणा करत अाहे.
शिरीष कुलकर्णीने डीएसके शिवाजी एन्स फुटबाॅल क्लब प्रा.लि. या कंपनीत अशाच प्रकारे २६ काेटी रुपये वर्ग केले असून त्याचा हिशेब त्याने दिलेला नाही. फुरसुंगी येथील १११ प्लाॅट एनसीडीकडे गहाण हाेते. हे प्लाॅट गुंतवणूकदारांची काेणतीही परवानगी न घेता त्याने कोट्यवधी रुपयांना विक्री केले अाहेत. त्याबाबतच्या मूळ पावत्याही देण्यास ताे टाळाटाळ करत असल्याचे पाेलिसांनी सांगितले अाहे. ज्या भागीदारी कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांकडून मुदत ठेव रकमा स्वीकारण्यात अालेल्या अाहेत, ती डीएसके ग्रुप अाॅफ पार्टनरशिप फर्म कंपनी अॅक्टखाली नोंदणीकृत करण्यात अालेली नाही. त्यामुळे रिझर्वह बँक आॅफ इंडियाच्या कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार रजिस्ट्रार अाॅफ कंपनीने केली अाहे.
शिरीष कुलकर्णीच्या पाेलिस काेठडीत ५ जुलैपर्यंत वाढ
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींचा मुलगा शिरीषच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने ५ जुलैपर्यंत वाढ केली अाहे. डीएसकेडीएल या कंपनीचा शिरीष भागीदार असून त्याने इतर भागीदारांसाेबत कट रचून खरेदी-विक्री व्यवहाराच्या नावाखाली बनावट दस्तएेवज तयार करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.